BPSC ने काल घेतलेली ६७ वी संयुक्त स्पर्धात्मक प्राथमिक परीक्षा रद्द

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : BPSC अर्थात बिहार लोकसेवा आयोगानं काल घेतलेली ६७ वी संयुक्त स्पर्धात्मक प्राथमिक परीक्षा रद्द केली आहे. प्रश्नपत्रिका ऑनलाइन फुटल्यानंतर आयोगानं हा निर्णय घेतला असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. BPSC च्या  परीक्षेच्या नवीन तारखा योग्य वेळी जाहीर केल्या जातील असं बीपीएससीचे अध्यक्ष आर के महाजन यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, बिहार  सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेला बीपीएससी पीटी परीक्षेच्या पेपरफुटीची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बिहारचे पोलिस महासंचालक एस के सिंघल यांनी दिली.