देशात जाणीवपूर्वक धृवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू - गृहमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : देशात जाणीवपूर्वक धृवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातल्या जनतेनं शांतता राखावी, आम्ही परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. ते एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

‘ईद’च्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेनंतर संवेदनशील भागांसाठी विशेष सूचना गृह मंत्रालयाकडून करण्यात येणार असून, त्यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मतं जाणून कारवाई करणार असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं.