संजय राऊत यांच्या विरोधात १०० कोटींच्या मानहानीचा दिवाणी दावा दाखल

 


मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे. सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या शौचालय घोटाळ्याच्या बातमीच्या संदर्भात हा दावा दाखल करण्यात आला आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय राऊत यांनी हे आरोप केल्याचं त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आलंय.