देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ३४ लाखाच्या वर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे.  त्यात ८६ कोटी  ८६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर २ कोटी ८३ लाख  लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना १० कोटी २० लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना ४ कोटी ६ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून सुमारे १० लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून ६० हजार नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी ५५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी २७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर २४ लाख ५१ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६५ लाख ८६ हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना २९ लाख ९२ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. 

Popular posts
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार
Image
नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या नोंदणी व पुनर्नोंदणीबाबत आवाहन
Image
एमटीडीसीमार्फत विशेष सवलतींची व पर्यटनस्थळांची माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचे – पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती सुनील तटकरे
Image
शेतकरी हितासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला टोमॅटो खरेदीची सूचना
Image