स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केलेले संकल्प सिद्धीला नेण्यासाठी युवावर्गाची भूमिका महत्त्वाची-प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केलेले संकल्प सिद्धीला नेण्यासाठी युवावर्गाची भूमिका महत्त्वाची असून आत्मनिर्भर भारत घडवण हे आपलं ध्येय असलं पाहिजे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल हैद्राबाद इथं इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. युवकांनी छोट्या उद्योगांच्या विस्तारासाठी नवनवे उपाय आणि मार्ग शोधावेत, असं पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, देशातील राजकीय घराणेशाही आणि ती चालवणारे पक्ष हे देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीनं घातक असून ते लोकशाहीचे शत्रू आहेत, अशी टीका पंतप्रधानांनी केली आहे. हैद्राबाद इथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते.