समाजात तेढ निर्माण करणारे मजकूर टाळाव - दिलीप वळसे पाटील

 

मुंबई (वृत्तसंस्था) : समाज माध्यमांमधून समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट नागरिकांनी टाकू नयेत. समाजमाध्यमांचा वापर संयमानं करावा असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या सभेला परवानगी देण्याबबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की सर्व सुरक्षा बाबींची काळजी घेऊन त्यांना सभा घेता येईल.

पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेली मारहाण ही नींदनीय बाब आहे, अशी टीका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. या प्रकरणी ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. ज्ञानवापी प्रकरणा बाबतीत बोलताना हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून लोकांनी समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे.