भारत-जर्मनीदरम्यान महत्त्वाचे हरित करार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जर्मनीने वन पुनर्संवर्धनाचा करार केला. केंद्रीय पर्यावरण वनं आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीच्या पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन मंत्री स्टेफी लेम्के यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

जैवविविधता आणि पर्यावरणाचं रक्षण तसंच हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं यादव यावेळी म्हणाले. पुनर्नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात हायड्रोजन वापराचा करारही काल भारत – जर्मनी दरम्यान झाला.

केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंग आणि जर्मनीचे अर्थमंत्री डॉ.रॉबर्ट हॅबेक यांच्या उपस्थितीत आभासी पद्धतीनं या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.