पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून एका संशयित दहशतवाद्याला राज्याच्या ‘दहशतवाद विरोधी पथकानं’ आज अटक केली. जुनैद मोहम्मद असं त्याचं नाव असून त्याला पुण्यातल्या दापोडी परिसरातून आज ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला मुंबईतल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आलं.

न्यायालयानं त्याला येत्या तीन जूनपर्यंत एटीएसची कोठडी सुनावली आहे. जुनैद हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातला रहिवासी असून तो गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. काश्मीरमधल्या एका अतिरेकी संघटनेकडून त्याला वित्तपुरवठा होत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या आरोपांवरून त्याला एटीएसची कोठडी सुनावली आहे.