सिंचन योजनांच्या पाणी वाटपाचं आणि पाणी पट्टी वसूल करण्याचे अधिकार उप अभियंतांकडे देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन - जयंत पाटील

 


मुंबई (वृत्तसंस्था) : सिंचन योजनांच्या पाणी वाटपाचं आणि पाणी पट्टी वसूल करण्याचे अधिकार उप अभियंतांकडे देण्याबाबतचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. गोसी खुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील शेतकरी सांगली जिल्ह्याच्या अभ्यास दौरावर आले असून या शेतकऱ्यांना जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाण्याचा विनियोग उत्तम करावा आणि शाश्वत व्यवस्था निर्माण कराव्यात असा सल्ला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.