देशात कोविडचे २ हजार १५८ रुग्ण बरे

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड  १९ चे २ हजार ६८५ नवे रुग्ण आढळले तर २ हजार १५८ रुग्ण बरे झाले. या कालावधीत देशात ३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या १६ हजार ३०८ आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के आहे.