कोस्टल रोडचे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, आदित्य ठाकरे यांचे निर्देश

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पश्चिम किनारपट्टीवर विविध टप्प्यांमध्ये कोस्टल रोडचे काम सुरू आहे. हे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. कोस्टल रोडच्या सुरू असलेल्या कामाचा ठाकरे यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. संबंधित सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या सहकार्यानं ही कामं नियोजित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, वाहतूक विभागाचे सह पोलिस आयुक्त  राजवर्धन यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image