मुंबई आणि इतर भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं राजेश टोपे यांचं आवाहन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालन्यात बातमीदारांशी बोलत होते. रुग्णांचं निदान करण्यासाठी कोविड चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील चाचण्या वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं.