सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायाधीश न्यायमूर्ती जमशेद बी. पारडीवाला यांनी आपल्या पदाची घेतली शपथ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायाधीश न्यायमूर्ती जमशेद बी. पारडीवाला यांना त्यांच्या पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती धुलिया गोहाटी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर, तर न्यायमूर्ती पारडीवाला गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत होते. न्यायमूर्ती धुलिया आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या नियुक्तीनं सर्वोच्च न्यायालयातली न्यायाधीशांची पदं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.