मुंबईत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता

 


मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज मुंबईत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर चक्रीवादळामुळे केरळ आणि कर्नाटकात पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. चक्रीवादळाचा परिणाम हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मान्सून पूर्व पावसाची सुरूवात २१ मे पासून होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसचं या उष्णतेच्या लाटेत उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वा-यांसह पावसानं हजेरी लावली.