ऊस तोडणीला वाहतुकीसाठी २०० रुपये प्रति टन अनुदान दिलं जाईल - अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले असून ऊस गाळपाच प्रमाणही वाढले आहे. त्यामुळं ऊस तोडणीला वाहतुकीसाठी २०० रुपये प्रति टन अनुदान दिलं जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत केली.  सांगलीतल्या पुराच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, अनेक ठिकाणी जुने ओढे-नाले बुजवून इमारती बांधण्यात आल्या. हेच पाणी इतरत्र पसरून पूर येतो. या सर्वांचं योग्य नियोजन झालं पाहिजे. 

सांगली महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारतर्फे 100 कोटी रुपये अनुदान दिले जातील. मिरज इथल्या मीरासाहेब दर्गा परिसर विकासासाठी 100 कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. याबाबत प्रस्ताव आल्यावर तत्काळ निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी जाहीर केलं.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image