राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या दोन हस्तकांना आज मुंबईत अटक केली. आरिफ अबू बक्र शेख आणि शब्बीर अबू बक्र शेख अशी त्यांची नावं असून, मुंबईच्या पश्चिम उपनगरात दाऊद टोळीसाठी बेकायदेशीर कारवाया आणि पैशांचे गैरव्यवहार यात त्यांचा हात असल्याचं एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. या दोघांना आज एनआयए न्यायालयात हजर करण्यात येईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या नोंदींचा हवाला देऊन आमच्या प्रतिनीधीनं कळवलं आहे, की दाऊद टोळीसाठी काम करणारी मोठी यंत्रणा सीमापार सक्रीय असल्याचं एनआयच्या तपासात आढळलं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला एनआयएनं मुंबई आणि मीरा रोड-भायंदर आयुक्तालयाच्या हद्दीत चोवीस ठिकाणी छापे टाकले होते. तसंच एकवीस संशयितांना अटक केली आहे. गेल्या फेब्रुवारीतही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.