राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता नाही - राजेश टोपे

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोवीडच्या चौथ्या लाटेची सुतराम शक्यता दिसत नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्यात कोरोनामुक्तीचा दर ९८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. लशीच्या वर्धक मात्रेबाबत केंद्राच्या सूचना आहे. त्यानुसार ही मात्रा दिली जाते आहे. अँटीबॉडीज टेस्ट करुन लोकांनी वर्धक मात्रेबाबत निर्णय घ्यावा, असंही टोपे म्हणाले. शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक भागातल्या पक्ष संघटनेला वेळ देतोय, कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय, त्यात आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर देत असल्याचं ते म्हणाले. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं