अखिल भारतीय कोळी समाज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हा माझ्यासाठी व्यक्तीगत दृष्ट्या समाधान आणि आनंद देणारी घटना आहे - राष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय कोळी समाज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हा माझ्यासाठी व्यक्तीगत दृष्ट्या समाधान आणि आनंद देणारी घटना असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला पाठवलेल्या एका शुभेच्छापर चित्रफित संदेशात त्यांनी हे मत व्यक्त केलं. 

ही संस्था उभी करण्यात आणि ती वाढवण्यात अपार मेहनत घेण्यात आली असून या संस्थेचा सुवर्णमहोत्सव साजरा होणं ही गर्वाची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपल्या आधीच्या पिढीच्या दूरदृष्टी असलेल्या लोकांनी समाजाला दिलेल्या मार्गदर्शनामुळे तरुण पिढीनं कोळी समाजाची ओळख प्रतिषठित केल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोळी समाजातल्या प्रत्येकानं केवळ समाज सुधारणेसाठीचं नव्हे तर राष्ट्र निर्माणासाठी काम करण्याची शपथ घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी आपल्या या संदेशात व्यक्त केली आहे.