मराठा आरक्षणातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याबाबत संबंधित जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी आढावा घ्यावा, आणि या संदर्भातली माहिती तात्काळ सादर करावी, असे निर्देश, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.

ते मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. एसईबीसी आरक्षणातल्या मराठा उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या, तसंच आरक्षणाची सद्यस्थिती या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.