विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी ११ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्र शिक्षण विभागाकडून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी ऑन लाईन नोंदणी प्रक्रियेला ११ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

सी ई टी परीक्षांच्या सुधारित अंदाजित वेळापत्रकानुसार प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण प्रवेश परीक्षा ५ ते २० ऑगस्ट दरम्यान, एम बी ए आणि एम एम एस प्रवेश परीक्षा २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान, एम सी ए  प्रवेश परीक्षा ४ आणि ५ ऑगस्टला, पद्व्यूत्तर स्थापत्यशास्त्र आणि हॉटेल व्यवस्थापन  प्रवेश परीक्षा २ ऑगस्टला तर पदवी हॉटेल व्य्ववस्थापन  प्रवेश परीक्षा २१ ऑगस्टला  होणार आहे, असं शासनानं एका पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image