मुंबईत कोरोनाचे १२३ नवे रुग्ण

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल कोरोनाचे १२३ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ११९ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. मुंबईत सध्या ८१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतला कोरोना मुक्तीचा दर ९८ टक्के असून, रुग्णदुपटीचा कालावधी ६ हजार ४९४ दिवसांवर आला आहे.