सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन विभागाकडून ३ शिकाऱ्यांना अटक

 


मुंबई (वृत्तसंस्था) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन विभागानं ३ शिकाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रं जप्त केली. व्याघ्र प्रकल्पाच्या गोठणे क्षेत्रात वाघांच्या गणणेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यात हे ३ शिकारी दिसल्यावर विभागानं ही कारवाई केली. हे तिघे शिकारीच्या उद्देशानं शस्त्रासहित प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात घुसले होते. वन विभागानं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.