प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अर्जमंजुरीत महाराष्ट्र आघाडीवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशात ३ हजार २१८ अर्जांना मंजूरी देण्यात आली असून यात महाराष्ट्र आघाडीवर आहे अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली .राज्यातल्या  ५७९ अर्जाना या योजने अंतर्गत मंजूरी मिळाली आहे. राज्यातले सर्वच जिल्हे या योजनेत सहभागी झाले असून औरंगाबाद, सांगली आणि पुणे जिल्ह्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे असं त्यांनी सांगितलं. या योजनेची माहिती पात्र आणि गरजू लाभार्थीपर्यंत पोहचवण्याचे निर्देशही कृषी मंत्र्यांनी दिले आहेत. राज्याला मिळालेल्या यशाबद्दल कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विभागातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं भुसे यांनी अभिनंदन केलं.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image