इतर मागास, बहुजन कल्याण मंत्रालयाकडून नवीन ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तींना मान्यता – इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

 

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले यामध्ये नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखापर्यंत मर्यादित आहे तो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. तसेच विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला व परराज्यात शिक्षण घेत असला तरी त्यास शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क लागू करण्यात आले आहे.

मागासवर्गीय, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने  इतर मागास बहुजन कल्याण विभाग सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी संपूर्ण ६०५ अभ्यासक्रम होते आता एकूण ७३६ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यात  २०२०-२०२१ सालापासून ४० तर २०२१-२०२२ पासून २४ अभ्यासक्रम नव्याने सुरु केल्याची माहिती यावेळी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image