युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी प्रधानमंत्र्यांची घेतली भेट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांनी भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला. व्यापार, वातावरण आणि डिजीटल तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत या बैठकीत सहमती झाली. 

त्याआधी परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी लेयेन यांची भेट घेतली. युक्रेन संघर्षाच्या आर्थिक आणि राजकीय परिणामांबाबत त्यांनी चर्चा केली. भागीदारी वाढवणं ही या दशकातली सर्वात महत्वाची प्राथमिकता आहे, असं लेय़ेन यांनी सांगितलं. भारत आणि युरोपीय संघात व्यापार, तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उभय पक्षीय व्यापार आणि तंत्रज्ञान स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.