मराठा क्रांती मोर्चाच्या विद्यार्थ्यांचं मंत्रालयात आंदोलन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : खासदार छत्रपती संभाजी यांच्या उपोषणाला दीड महिना उलटला तरीही त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य सरकारनं केली नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी आज मंत्रालयात आंदोलन केले.

सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या दालनासमोरच विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजि केली. राज्य सरकारने संभाजीराजेंना १४ आश्वासने दिली होती. त्याल एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

मराठा समाजाच्या चार हजार विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्नही प्रलंबित आहे. सरकारकडून केवळ चालढकल केली जात असल्याचा आरोप करतानाच जोपर्यंत प्रश्न सोडविले जात नाहीत तोवर हटणार नसल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image