लखीमपूर खेरी प्रकरणातले आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज रद्द

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरी प्रकरणातले आरोपी आशिष मिश्राचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. न्यायालयानं त्यांना एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देशही दिले आहेत.

उच्च न्यायालयानं लखीमपूर खेरी इथल्या हिंसाचारात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं ऐकून घेतले नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आशिष मिश्रा यांना घाईघाईत जामीन मंजूर करण्यात आला, याप्रकरणी उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी घ्यावी, असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पूत्र आशिष मिश्रा यांनी लखीमपूर खेरी इथं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. यात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.