प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या काळात महिलांची आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उन्नती - स्मृती इराणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या काळात महिलांची आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उन्नती झाली, असं केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी  म्हटलं आहे. त्या आज "जग वाचवण्यासाठी ७ महासत्ता" या विषयावर  संयुक्त राष्ट्रांच्या देशातल्या शाखेच्या वतीनं मुंबईत इथं आयोजित "बदल घडवणारे तरुण" या परिषदेत बोलत होत्या.

केंद्र सरकारनं २३ कोटी भारतीय महिलांना बँक खाती उघडून दिली आणि कोविड १९ च्या कठीण काळात ३० हजार कोटी रुपये दिले आहेत. या खात्यांमध्ये पैसे थेट जमा झाले, असंही त्या म्हणाल्या. मुद्रा योजनेंतर्गत ३२ कोटी कर्ज वाटपांपैकी ६८ टक्के कर्ज महिलांना देण्यात आले.

मोदी सरकारनं आयुषमान भारत या अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत १० कोटी कुटुंबांना परवडणारी आरोग्य सेवा दिली आहे, असंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.