अकोला जिल्ह्यात एस टी महामंडळाचे ३०० संपकरी कर्मचारी कामावर परतले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अकोला जिल्ह्यातल्या पाच आगारामधून एस टी महामंडळाचे ३०० संपकरी कर्मचारी कामावर परतले आहेत. राज्य परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप आता संपुष्टात येत आहे.

उच्च न्यायालयानं २२ एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा आदेश दिला असल्यानं, कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे.