अक्कलकोट इथं श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अक्कलकोट इथं आज श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावानं साजरा झाला. पहाटे ५ पासून काकड आरती, भजन,पाळणा आणि आरती सुंद्री वादन, शास्त्रीय राग गायन तसंच सुमधुर भावभक्तिगीतांचं गायन इतयादी कार्यक्रमांनी स्वामींचा प्रकटदिन साजरा झाला.

स्वामी प्रकट दिनानिमित्त देवस्थानच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णसेवेतून समाज सेवेत सहभाग नोंदविला.गुढी पाडवा, शनिवार, रविवारच्या सलग सुट्टयांमुळे दिवसभरात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतलं.

भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्याकरिता सर्व स्वामी भक्तांना टप्प्या टप्प्याने दर्शनासाठी मंदीरात सोडण्यात आले. आरतीनंतर स्वामी प्रकट दिनानिमित्त आज वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्या वतीने नैवेद्य सर्व स्वामी भक्तांना शिरा प्रसाद वाटप करण्यात आलं. याशिवाय मंदीरात भाविकांच्या वतीने होणार्याा संकल्पित अन्नदानच्या माध्यमातून दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष इथं उपस्थित सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन देण्यात आलं.

महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, केरळ, गुजरात, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू काश्मीर पंडीत, राजस्थान, उत्तरप्रदेश वाराणसी यासह देश आणि विदेशातील स्वामी भक्तांनी तीर्थक्षेत्री श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात येवून महाप्रसादाचा लाभ घेतला.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image