मराठी नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

मुंबई : मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष आशाआकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईलअसे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, ‘आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे एका बिकट परिस्थितीवर मात करू शकलो आहोत. निर्बंधातून मुक्त होऊ शकलो. हीच सज्जतासतर्कता यापुढेही ठेवूया. अशा अनेक आव्हानांवर मात करण्याची ताकदहिंमत अंगी बाणवूया. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा”