अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरातल्या ईशान्येकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या टप्प्यांमुळे अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता असून आज संध्याकाळपर्यंत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून काल पोर्ट ब्लेअर मध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचं वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अंदमान आणि निकोबार बेटांवर पर्यटकांच्या फिरण्यावर उद्यापर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.