कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटळला

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं. कोरोना काळात कोणतंही काम निविदेशिवाय केलं नाही असं म्हणत, त्यांनी विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले.

मुंबई महापालिकेनं धारावी वाचवली त्याचं तरी कौतुक करावं असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला, ही अघोषित आणीबाणी असल्याचं ते म्हणाले. आपण टीका आणि बदनामीला घाबरत नाही, पण कुटुंबीयांची बदनामी करू नये असं ते म्हणाले. मॉल्समध्ये वाईन विक्रीची सक्ती केलेली नाही, त्यावर अजून निर्णय व्हायचा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.