पेटीएम च्या पेमेंट्स बँकेला नवी खाती उघडायला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मनाई

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेटीएम या पेमेंट्स बँकेला नवी खाती उघडायला भारतीय रिझर्व्ह बँकेनं मनाई केली आहे. याबाबतचा आदेश रिझर्व्ह बँकेनं काल जारी केला. हा आदेश तात्काळ प्रभावानं लागू केला असल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

पेटीएम बँकेच्या पर्यवेक्षणात काही दस्तावेजांसंबंधी शंका वाटत असल्यानं, ही कारवाई केली असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. पेटीएम बँकेनं, माहिती तंत्रज्ञान लेखापरिक्षणविषयक संस्थेची नियुक्ती करून, आपल्या माहिती तंत्रज्ञान यंत्रणेचं लेखापरिक्षण करून घ्यावं असे निर्देशही रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत.

माहिती तंत्रज्ञान लेखापालांचा अहवाल मिळाल्यानंतरच, नव्या खातेदारांविषयीचा निर्णय घेतला जाईल असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image