छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार सर्वत्र साजरीमुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. आज मुंबईत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दादरच्या शिवाजी पार्क इथं शिवजयंतीची साजरी करण्यात आली. या निमित्तानं पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी महिला बाईक रॅली काढली. शिवाजी पार्कचा संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आला होता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्तानं  पारंपारिक वाद्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचही आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.