उद्यापासून ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरूवात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्यापासून बीड इथं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला सुरूवात होत आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होत आहे. राज्य नाट्य स्पर्धेला रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहित करावं असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी केलं आहे. बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन १० मार्च ते २० मार्च या कालावधीत संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ११ नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत.
संबंधित बातम्या