फोन टॅपिंग प्रकरणी आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अटकेपासून तात्पुरतं संरक्षण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अटकेपासून तात्पुरतं संरक्षण दिलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांचे फोन शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे टॅप केल्याची तक्रार कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

ती रद्द करावी या मागणीसाठी शुक्ला यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायमूर्ती पी. बी. वराळे आणि न्यायमूर्ती एस एम मोडक यांच्या खंडपीठानं काल हा आदेश दिला. सध्या हैद्राबाद इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दक्षिण विभागीय अतिरिक्त महासंचालक पदी काम करणाऱ्या रश्मी शुक्ला पोलीस ठाण्यात चौकशीकरता 16 ते 23 मार्च दरम्यान हजर राहतील आणि पूर्ण सहकार्य करतील असं शुक्ला यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. पुढची सुनावणी येत्या 1 एप्रिलला होईल.