लोक अदालतमध्ये १२ मार्च रोजी पक्षकारांनी व वकिलांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन

  राष्ट्रीय लोकअदालत ११ डिसेंबर रोजी

मुंबई : दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने १२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. संबधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन दक्षिण मुंबई ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा स्नेहा म्हात्रे यांनी केले आहे.

ज्या पक्षकारांची ग्राहक तक्रारी संबंधित प्रकरणे दक्षिण मुंबई जिल्हा आयोगासमोर प्रलंबित आहेत त्यांनी आपली प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरिता जिल्हा आयोग कार्यालयाशी संपर्क साधावा. या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असेही त्यांनी सांगितले आहे.