ISRO द्वारे 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ISRO अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आज सकाळी श्री हरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलवी-सी52 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. या यानाच्या मदतीनं  ३ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आले असून या  प्रक्षेपणाचे चारही टप्पे यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं ISRO चे अध्यक्ष सी. एस. सोमनाथ यांनी म्हटलं आहे. 

पीएसएलवी-सी52 यानाच्या मदतीनं सोडण्यात आलेल्या  EOS-04 या उपग्रहाच्या मदतीनं कुठल्याही  प्रकारच्या हवामानात चांगल्या दर्जाची  छायाचित्र काढता येतील.  कृषी, वन आणि जलसंधारण क्षेत्राला  या छायाचित्रांचा उपयोग होईल. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  PSLV C52 यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल  या अभियानात सहभागी झालेल्या  सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे.