मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ आज मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम सुरू असताना दरड कोसळली. त्यामुळे दोन पोकलेन यंत्रं दरीत कोसळली असून एका चालकाचा मृत्यू झाला. आज सकाळी पावणेअकरा वाजता ही दुर्घटना झाली. दरडीखाली दोन पोकलेन आणि त्यांचे चालक अडकले आहेत. घाटात चौपदरीकरणासाठी डोंगर कापण्याचं काम सुरू आहे. रस्त्याच्या वरच्या बाजूला पोकलेननं खोदकाम करत असतानाच बाजूचा डोंगराचा भाग खाली आला. या घटनेमुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image