भारतीयांच्या सुटकेसाठी ४ केंद्रीय मंत्री विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातले हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे चार मंत्री युक्रेनच्या शेजारच्या चार देशांचा दौरा करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना साहाय्य आणि सुटकेच्या मोहिमेत अधिक समन्वयासाठी हा दौरा आहे. हरदीप सिंग पुरी हंगेरीला तर ज्योतिरादित्य शिंदे रोमानिया आणि मोल्दोवा या देशात जाणार असून किरेन रिजिजू स्लोव्हाकिया तर जनरल व्ही. के. सिंग पोलंडला जाणार आहेत. 

प्रधानमंत्र्यांनी उत्तर प्रदेशहून काल परत आल्यावर तात्काळ युक्रेनसंदर्भात बैठक घेतली. युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.