नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतीतलं नवं तंत्रज्ञान आणि नव्या पद्धती शेतकऱ्यांपर्यंतपोहोचवून ग्रामीण भारताची नवी प्रतिमा निर्माणकरण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज ग्रामीणविकास क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींबाबत आयोजित वेबिनारमध्येबोलत होते.

२०२२ सालच्या अर्थसंकल्पात ग्रामीण तसंच ईशान्य भारत आणि प्रगतीची आकांक्षाअसलेल्या जिल्ह्यांच्या   विकासासाठी पथदर्शकतरतुदी करण्यात आल्याचं ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीणसडक योजना आणि जल जीवन मिशन सारख्या विविध योजनांचं लक्ष्य गाठण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातस्पष्ट आखणी करण्यात आल्याचं ते म्हणाले.

जमिनीबाबतची कागदपत्र आणि अन्य दस्त ऐवजांचंडिजिटायझेशन करणं आणि जमिनीच्या सीमा निर्धारणाचं काम तंत्रज्ञानाबरोबर जोडणं ही  काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. गावांचं आणि जमिनीचं योग्य सीमांकन होणं आवश्यक असूनप्रधानमंत्री स्वामित्व योजने अंतर्गत याची तरतूद यशस्वीपणे करण्यात आल्याचं प्रधानमंत्रीम्हणाले.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image