केवळ TCS, IBPS आणि MKCL मार्फतच भरती प्रक्रिया राबवण्याचे राज्य मंत्रीमंडळाचे आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मंत्रीमंडळानं विविध पदांच्या भरतीसाठी पॅनलवरच कुठल्याही कंपनीची सेवा घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. यापुढं पदभरतीच्या सर्व TCS, IBPS, MKCL च्या माध्यमातून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १५ डिसेंबरला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध करण्यात आला आहेत. परीक्षेसाठी पॅनलवर असलेल्या सर्व कंपन्यांच्या पॅनलला मंत्रीमंडळानं स्थगिती दिली आहेत. त्यामुळं राज्य सरकारचे विविध विभाग, महामंडळं आणि इतर सहयोगी संस्थांना TCS, IBPS, MKCL च्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवावी लागेल.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image