मालवणीतले दोघे जण NIA कोर्टात दोषी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : एनआयएच्या विशेष न्यायालयानं मालवणी आयसिस खटल्यातल्या दोन आरोपींना काल दोषी ठरवलं आहे. आयसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी तरुणांना भडकवल्याच्या आरोपावरून रिझवान अहमद आणि मोहसीन इब्राहिम सय्यद या दोन तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने डिसेंबर २०१५ मध्ये काळाचौकी पोलीस ठाण्यात अटक केली होती. मालवणी परिसरातल्या मुस्लीम तरुणांना आयसिसचे फिदायीन लढवय्ये होण्याकरता हिजरत करून परदेशी जाण्यासाठी आणि भारताविरुद्ध युद्ध करण्यासाठी हे दोघेजण चिथावणी देत असल्याचं निदर्शनाला आले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मार्च २०१६ मध्ये त्यांच्यावर पुन्हा खटला दाखल केला होता आणि  जुलै २०१६ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. त्यांना देण्यात येणारी शिक्षा उद्या घोषित केली जाईल.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image