कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लसींना प्रौढांसाठी नियमित स्वरुपात सशर्त मंजुरी देण्याची विषय तज्ज्ञ समितीची शिफारस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या कोविड-१९ प्रतिबंधक लसींना काही अटींवर नियमित मंजुरीची शिफारस केली आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या लसींना या पूर्वी आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापराचा दर्जा देण्यात आला होता. त्या अटीमध्ये बदल करून प्रौढांकरिता नियमित वापरासाठी त्यांना नव्यानं मंजुरी द्यावी अशी शिफारस विषय तज्ज्ञ समितीनं केली असल्याचं केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना अर्थात सीडी एससीओच्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. भारतीय औषध महानियंत्रक संस्था अर्थात DCGI या शिफारशींचं मूल्यमापन करून अंतिम निर्णय घेईल, असंही या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. सीरम इन्स्टिट्यूटनं कोविशील्ड ला तर भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लसीला बाजार मंजुरी देण्याची मागणी अर्जाद्वारे केली होती.