माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत संक्रांतीचं वाण म्हणून कचऱ्याचे डबे देऊन सण साजरा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्ह्यातल्या नारायण चिंचोले इथल्या महिलांनी माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत संक्रांतीचं वाण म्हणून कचऱ्याचे डबे देऊन सण साजरा केला. यावेळी आयोजित महिला मेळाव्यामध्ये माझी वसुंधरा कार्यक्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्याचं महत्व पटवून दिलं. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी  मंदिर परिसर आणि स्मशान भूमीत वृक्षारोपण केलं. यावेळी कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन झालं.