भारतीय खुल्या बॅडिमटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय खुल्या बॅडिमटन स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू आणि जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी काल दिमाखदार विजयाची नोंद करत महिला आणि पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत सिंधूनं ३६ मिनिटांत २१ वर्षीय अस्मिता चालिहा हिला २१-७, २१-१८ असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत सिंधूचा थायलंडच्या सहाव्या मानांकित सुपानिडा कॅटरथाँग हिच्यासोबत सामना होणार आहे. तर पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत लक्ष्य सेननं एचएस प्रणॉयवर संघर्षपूर्ण विजय मिळवला. उपांत्य फेरीत लक्ष्य सेनची लढत मलेशियाच्या एनजी त्झे योंग किंवा आयर्लंडच्या न्हाट गुयेनशी होणार आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image