गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा मात्र प्रकृती उत्तम असल्याचं मुंबईच्या महापौरांचं स्पष्टीकरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लता दीदींना कोरोनाची कुठलीही लक्षणं नाहीत तसंच त्यांना ऑक्सिजन देण्याची गरज नसल्याचंही महापौरांनी सांगितलं. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना काल रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी कळवलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी लता दीदींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.