मुंबईत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन करावा लागेल- किशोरी पेडणेकर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, आणि दररोज वीस हजारच्या वर रुग्णांचा आकडा गेला, तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतल्या शाळा बंद झाल्या आहेत. गर्दी टाळण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे. मात्र त्यानंतरही दुर्लक्ष केलं जात असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.