मुख्यमंत्र्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना केल विनम्र अभिवादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहेत. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वारसा  जपण्याचं सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चित आहे, असा विश्वास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. त्यांनी जांभेकर यांना विनम्र अभिवादन केलं आणि मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला वंदन, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.